भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Saturday, December 16, 2017

शिवजन्मोत्सव

जय जिजाऊ.. जय शिवराय
    विश्ववंद्य, आदर्शवादाचा मानबिंदू छञपती शिवराय..
  खरेतर, कोणत्याच महापुरूषाच्या नावाने वाद असता कामा नये. त्यातही किमान जन्मतारखेवरून तरी नक्कीच नाही. पण,ज्य वादावर कायमचा पडदा पडला असताना शिवाजी महाराज यांच्या जयंती बाबत हा वाद का करतात..?
आज जग कुठे गेले आहे,आपण कुठे चाललोय..? आपण ग्लोबल होत असताना,जगाच्या नजरा आपल्याकडे असताना..
चंद्रावर पाऊल टाकले असताना, जगभरातील सर्व कारभार हे तारखेनुसारच होत असताना
आमचे वाढदिवस आम्ही तारखे नुसार साजरे करत असताना जयंतीचा आग्रह तिथी नुसार का करतोय..?
ज्यांना हा वाद चघळायचाय त्यांचे वाढदिवस,जयंत्या तिथी नुसार करा,परंतू अवघ्या विश्वाला वंद्य असलेल्या महाराजांची जयंती ही तारखेनुसारच व्हावी असा माझ्या सहीत अनेकांचा आग्रह आहे आणि तो खराही आहे.तो कसा तर
अवघा महाराष्ट्र, मराठी माणूस आणि संपूर्ण देशाला छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी ओळख करून दिली ती महात्मा फुले यांनी. सन 1869 मध्ये महात्मा फुले यांनी छत्रपती शिवरायांची रायगडावरील समाधी शोधून काढली. इतकेच नव्हे तर, शिवरायांच्या आयुष्यावरील जगातील सर्वात पहिला आणि दीर्घ पोवाडा कोणी लिहीला असेल तर, तोही महात्मा फुले यांनीच. शिवरायांचे कार्य आणि कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचावे. त्यांच्या शौर्याची कथा घराघरात माहिती व्हावी. त्यांच्या ज्वाजल्य नेञदिपक इतिहासाने लहान थोर पेटून उठावे यासाठी महात्मा फुले यांनी 1870 मध्ये पहिल्यांदा शिवजयंती सुरू केली. हा कार्यक्रम पुण्यात पार पडला. तेव्हापासून आतापर्यंत शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात पार पडते. दिवसेंदिवस शिवजयंतीची क्रेज तरूण आणि अबालवृद्धांच्या मनात वाढतच आहे.
      शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की, तिथीनुसार हा फार जुना वाद आहे. तारखेनुसार *शिवजयंती साजरी केली तर, प्रतिवर्षी ठरलेल्या तारखेलाच शिवजयंती साजरी होते.* *जगभरातील महापुरूषांची जयंती ही तारखेनुसारच साजरी होते. पण, तिथीनुसार जर शिवजयंती साजरी केली तर मात्र, एकच तारीख नक्की राहात नाही. ती प्रत्येक वर्षी बदलते. त्यामुळे हा वाद निकाली काढवा यासाठी महाराष्ट्र सरकारने 1966-67 मध्ये एक समिती नेमली. या समितीत वा.सी.बेंद्रे, न.र.फाटक, ग.ह.खरे, द.वा. पोतदार, डॉ.आप्पासाहेब पवार अशी दिग्गज मंडळी होती. या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला. त्यात समितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शिवरायांची असल्याचे सांगितले. तेव्हापासून  देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात. ही तारिख वर्षातून ठरलेल्या दिवशी एकदाच आणि एकाच महिन्यात येते. म्हणूनच शिवरयांची जयंतीचा  ही तिथीनुसारचा वाद न घालता  शिवजन्मोत्सव 19 फेब्रुवारीलाच करावा असा माझा आणि तमाम इतिहास अभ्यासक त्याच बरोबर सर्व शिवप्रेमींचा आग्रह आहे..!*
*जय जिजाऊ जय शिवराय*
   *शिवश्री संतोष तळेकर सर*
             *8275941474*

No comments:

Post a Comment