भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

गणित मित्र

गणित मित्र 
प्रत्येक माणसाचं आयुष्य ज्या विषयाशी बांधले आहे,सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत ज्याचा आपण वापर करतो,ज्या विषयाचा प्रत्येक विषयाशी या ना त्या कारणाने समन्वय येतो मग असा तो कोणता विषय असेल तर तो म्हणजे गणित ..!
मी लहान असताना एक सुविचार ऐकला होता तो म्हणजे गणिताच्या अरण्यातून जाताना चिन्हांची कु-हाड सोबत असावी...! त्यावेळी त्या सुविचाराचा अर्थ नीटसा समजला नाही परंतू बाकी विषयांपेक्षा या विषयात काहीतरी वेगळं पण आहे, एवढं मात्र उमगलं होते,मग या जंगलात गेली तीस वर्षे विहार करतोय ते या कुऱ्हाडीला सोबत घेऊन..!                        
 आज गणित संबोध निमित्त पुन्हा गणिताशी मैत्री करावीशी वाटली..म्हणून हा लेख प्रपंच..!                        
माझ्या गणित मित्राचा जन्म नक्की कुठे झाला माहित नाही परंतू माणूस म्हणून जेव्हा तो पृथ्वीवर अस्तित्वात आला तेव्हापासून गणित जन्माला आले असे माझे मत आहे,कारण प्रत्येक गोष्टीत तो किती ?हा शब्द खुणेन,बोलण्यातून अथवा त्याच्या त्या वेळच्या भाषेतून तो प्रकट करत होताच..!त्यानंतर आज पर्यंत रोज काहीतरी नव्याने या गणिताची प्रगती होत आहे नवनवीन संकल्पनाची भर त्यामध्ये पडत आहे,अनेक शास्रज्ञ,संशोधक यांनी आपल्या बुद्धीचा कस लावला ,नवनवीन प्रयोग करून या गणित विषयास सजवल,फुलवल,एका विशिष्ट उंचीवर पोहचवले अशा सर्व महापुरुषाना मी अभिवादन करतो...!
     गणिताचा सध्याचा विकास अमूर्त संकल्पनांच्या चढत्या भाजणीतून किंवा विषयाच्या विस्तारातून झाला असे मानता येईल. संख्या ही अमूर्ततेची पहिली पायरी होय. दोन संत्री आणि दोन सफरचंदांमध्ये (दोनत्वाचे)काहीतरी साम्य आहे सुद्धा मानवी प्रज्ञेची महत्त्वाची उडी होती. भौतिक वस्तूंची मोजदाद करण्याशिवाय प्राचीन लोकांना काळासारख्या अमूर्त कल्पना (जसे दिवस, महिने वर्ष) कसे मोजावे याचेही ज्ञान होते. अर्थातच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांसारख्या मूलभूत अंकगणिती क्रिया येणे क्रमप्राप्तच होते. प्राचीन काळातील भव्य वास्तू पूर्वजांच्या भूमितीच्या ज्ञानाची साक्ष देतात.
      गणिताच्या अधिक प्रगतीसाठी लेखनाची किंवा संख्यांची नोंद करण्याची पद्धतीची गरज मानवास पडली. पडताळ्याच्या रेघा किंवा इंका साम्राज्यातील क्विपू नावाच्या गाठ मारलेल्या दोऱ्या वापरून संख्यात्मक माहितीची नोंदी ठेवल्या जात होत्या. जगभर विविध संख्यापद्धती प्रचलित होत्या.लिखित इतिहासाच्या प्रारंभापासूनच  आकडेमोड करण्यासाठी, संख्यांचा परस्परसंबंध समजण्यासाठी, जमिनीची मोजणी करण्यासाठी आणि खगोलीय घटनांचा वेध घेण्यासाठी गणिताची निकड भासली. यावरूनच मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल यांच्या अभ्यासांचा गणिताच्या शाखांशी स्थूलरूपाने संबंध जोडता येतो.विज्ञान आणि गणित यांचा एकमेकांशी परस्परपोषक असा संबंध असल्याने असून हल्लीचे गणित अतिशय विकसित आहे. गणित आणि इंग्रजीसारखे विषय मुलांना खूप अवघड वाटत असतील, तर त्याची कारणे मुळापासून शोधून त्यांचे निराकरण करावे लागेल. गणितासारख्या आयुष्यात पदोपदी उपयोगाला येणाऱ्या विषयाकडेच पाठ फिरविणे हे कोणाच्याच हिताचे नाही.त्यासाठी बेसिक मुलांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहचणे गरजेचे आहे.एका सर्वेतून एक बाब लक्षात आले की इयत्ता पहिली-दुसरीत मुले पटकन गणित सोडवतात परंतु नंतर तो वेग मंदावतो पुढे चालून तर तो पर्यायी विषय होऊन बसतो,ही बाब अतिशय गंभीर आहे,यामागील कारणे शोधत असताना असे लक्षात आले की,मेहनत करून सुद्धा परिणाम मिळत नाही.तेव्हा मेहनतीची दिशा बदलण्याची आवश्यकता आहे असे वाटले,विद्यार्थ्यांना गणितातील मुलभूत संबोध समजणे गरजेचे आहे.त्यामध्ये अनेक पद्धती अनेक साधने वापरून गणिताला गणितपण देणे गरजेचे आहे,आपल्याकडे उपलब्ध असलेले साहित्य,गणित पेटीचा वापर करून संकल्पना मुलांत रुजवणे गरजेचे आहे,त्यासाठी गणिताशी मैत्री करावी लागेल.अनेक सहकार्यांची मदत घ्यावी लागेल.ज्ञानाचे आदान प्रदान करून हा गणिताचा रथ असाच पुढे चालावा लागेल..!मित्रानो यासाठी आपल्या मित्राची (धनराज गजानन येलमुलवार,जि.चंद्रपूर) गणित संबोधची व्हीडीओ देत आहे ती खालील लिंकवर क्लिक करून DOWNLOAD करा 
 संख्याज्ञान
बेरीज
वजाबाकी
गुणाकार
भागाकार





1 comment: