भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Thursday, September 14, 2017

आज अभियंता दिवस...!!

भारतरत्न मा.सर डॉ.विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवस..
सर्व अभियांञीकांना आभाळभरून शुभेच्छा...!!
आजच शिवाजी महाराजांचा एक अभियांञीक हिरा...म्हणजे हिरोजी इंदुलकर यांचाही स्मरण दिवस या महान मानवास मानाचा मुजरा..!!
   आज याच दिवसाचे औचीत्य साधून मला जाणवलेल सर्वत्कृष्ठ अभियांञीकी म्हणजे छञपती शिवाजी महाराज आणि त्यांची मावळारूपी दौलत..!!
रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास रासिवटा व तणस अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून
महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्या प्रमाणे दिड गांव उंच.पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तोउंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.
शिवराज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर आलेलाइंग्रज वकील टॉमस निकल्स रायगड दर्शनाने इतका प्रभावित झाला अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्यास हा गड थोड्या सैन्यासह सुद्धा संपूर्ण जगविरूध्द लढू शकेल
अशी नोंद केली
याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे.
१.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्विप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर १५.पूर्वेकडील जिब्राल्टर
 अशा या महान अभियंत्यानी बांधलेली ही स्वराज्याची राजधानी ..महाराजांच्या कल्पनेच्याही पलीकडे झेप घेतली होती..महाराज खुश झाले..बोल हिरोजी तुला काय हवय ते..तेव्हा हा निष्ठावान अभियंत्यानी मला फक्त एका पायरीवर माझे नाव टाकायची अनुमती द्या महाराज तुम्ही जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाल तेव्हा तुमच्या पायाची पायधुळ माझ्या मस्तकी सतत आशिर्वाद देत राहील..!!
अशा या महान अभियंत्यास विनम्र अभिवादन...!!
संतोष राहीबाई भगवान तळेकर.
💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment