भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Tuesday, September 12, 2017

एका गणित शिक्षकाने एक प्रयोग केला त्याने 30 विद्यार्थ्यांचेदोन ग्रुप केेले.15 विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपला एका वर्गात बसविले आणि दुसर्या 15 विद्यार्थ्यांच्या ग्रुपला दुसर्या वर्गात बसविले. ते शिक्षक पहिल्या वर्गात गेले आणि तेथे फळ्यावर एक गणित मांडले.गणिताचा प्रश्न लिहून ते म्हणाले हे जगातील सर्वात सोपे गणित आहे.ज्याला गणित जमत नाही त्याला सुध्दा हे गणित सोडवता येईल.हे सांगून ते दुसर्या वर्गात गेले. दुसर्या ग्रुपला पण तेच गणित फळ्यावर मांडले आणि विद्यार्थ्यांनासांगितले हे जगातील सर्वात अवघड गणित आहे.खुद्द आईनस्टाईनला सुध्दा हे गणित सोडविता आले नव्हते.पाहु कोणाला गणिताच्या एखाद्या दोन पायर्या जमता का?थोड्या वेळाने ते शिक्षक दोन्ही वर्गात गेले.जिथे सांगितले होते की, हे जगातले सर्वात सोपे गणित आहे तेथील 15 पैकी 13 विद्यार्थ्यांनाते गणित बरोबर सोडविता आले.दुसर्या वर्गात जिथे सांगितले होते की, हे जगातील सर्वात अवघड गणित आहे तेथील 15 पैकी 14 विद्यार्थ्यांनाते गणित सोडविता आले नाही.काय झाले असेल या विद्यार्थ्यांना? काय घडले असेल त्यांच्या मनात?एकदा का मनाला हे पटले की एखादी गोष्ट आपल्याला जमु शकत नाही तर त्यांना ती जमत नाही.आपल्या बोलण्यावागण्यातुन विद्यार्थ्यांनासमजले की, ही कठीण गोष्ट आहे आणि यात आपण अपयशी होवू तर विद्यार्थी मनाच्या पातळीवर तसाच विचार करतात. त्यांची ठाम समजूत होते की, आपल्याला हे जमू शकतनाही.मला असे वाटते मुलांमध्ये “मला जमू शकते,“ “आय कॅन डू “ ही भावना खोलवर विद्यार्थ्यांमध्ये रुजवतील तेव्हा आपण गुणवत्तापुर्ण शिक्षणपध्दतीच्या दिशेने वाटचाल करू.

No comments:

Post a Comment