भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Thursday, October 19, 2017


एक पणती माझ्या स्वराज्याची...
एक पणती माझ्या राजमाता जिजाऊची 
एक पणती माझ्या शिवरायांची..
एक पणती माझ्या  शंभू राजांची ...
एक पणती ह्या मातीसाठी रक्त सांडलेल्या मावळ्याची...
एक पणती अभेद्य बुलंद आमच्या गडकोटांची...
एक पणती माझं स्वराज्य रक्षिलेल्या त्या प्रत्येक चि- याची...
एक पणती माझ्या राजा पुढं झुकलेल्या त्या सागरी लाटांची...
एक पणती बाजीची, तानाची, जीवाची...
एक पणती थोर भाग्यवंत त्या काशीद शिवाची...
एक पणती त्या अफाट बेलाग
सह्याद्रीची...
एक पणती उरी दाटलेल्या अभिमानाची...
एक पणती प्रेम वात्सल्य मायेची...
एक पणती अभिमान,शौर्य,राष्ट्रप्रेमाची...
एक पणती माझ्या स्वराज्याच्या थाटाची...
एक पणती राजं तव चरणी
एक पणती भारताच्या अभेद्य सिमेवर वीर मरण पत्करणा-या जवानांसाठी..
एक पणती माझ्या राञंदिन काबाडकष्ट करून या भारत देशाला अन्नधान्य पुरवणा-या बळीराजासाठी..
"ईडा पीड़ा टळू दे अन बळीच  राज्य येऊ दे "....

जय जिजाऊ जय शिवराय ! !
दीपावलीच्या शिवमयी शुभेच्छा ...
शिवश्री संतोष तळेकर सर
📞८२७५९४१४७४
💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment