मराठा आरमार दिन
(२४ ऑक्टोबर १६५७)
वयाच्या २७ व्या वर्षी कोकण किनारपट्टीवर आरमार दलाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज ! सागरी सीमांच्या सुरक्षेबरोबरच परकीय व्यापाराला चालना देणारी घटना ! “ज्याचे आरमार त्याचा समुद्र” हे सुत्र समजावुन सांगणारी कृती !
मनुस्मृतीच्या धार्मिक कायद्यात लादलेल्या सप्तबंदीपैकी समुद्र उल्लंघन बंदी ही एक, मात्र महाराजांनी स्वराज्याच्या सुरक्षेचा विचार करुन प्रसंगी जाचक ठरणारे धार्मिक कायदे मोडायलाही मागेपुढे पाहिले नाही. काळाच्या पुढचा हा विचार होता. एवढ्या दूरदृष्टीने महाराजांनी आरमार दल उभे केले, वाढवले. समुद्रावर त्याची दहशत निर्माण केली. पुढे आंग्रेंनी त्याचा विस्तार केला. एक काळ असा होता की समुद्रावर मराठा आरमार अधिराज्य गाजवत होतं.
"छत्रपती शिवरायांना इंडियन नेव्हीचे जनक" म्हणुन ओळखले जाते. लोणावळ्यातील नावल प्रशिक्षण संस्थेला आयएनएस शिवाजी नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. मराठा आरमार दलाची देशाच्या इतिहासातील अनेक घटनांना कलाटणी देणारी घटना होती, त्यामुळे २४ ऑक्टोबर हा दिवस “मराठा आरमार दिन” पर्यायाने “भारतीय आरमार दिन” म्हणुन साजरा व्हायला हवा...
जय जिजाऊ जय शिवराय
#MarathaNavyDay #मराठाआरमारदिन
No comments:
Post a Comment