छत्रपती शिवरायांच्या गादीवर विराजमान होऊन शिवरायांचा वारसा चालवित जनकल्याणाचे सूत्र ज्यांनी आयुष्यभर चालविले अशा महान छत्रपतींवर वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी काळाने घाला घातला.
बुरुजासम प्रचंड व पोलादासम मजबूत देहही काळास काही वर्षे पुढे ढकलू शकला नाही.
रयतेसाठी काय नाही केले महाराजांनी ? आयुष्यातील प्रत्येक क्षण रयतेसाठी झिजले.
राधानगरी धरण व शिवाजी स्मारक शिक्षणसंस्था ही महाराजांची लोककल्याणकारी स्वप्ने होती ती महाराजांनी मार्गी लावली मात्र ती पूर्ण झालेली पाहण्याचे भाग्य महाराजांच्या नशिबी नव्हते.
१९२२ साली आज रोजी छत्रपती शाहू महाराज थोरल्या महाराजांचे चरणी लीन झाले.
अशा या महापुरूषांस स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...!!
शिवश्री संतोष तळेकर सर
8275941474.
💐💐🙏🏻🙏🏻💐💐
No comments:
Post a Comment