भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Sunday, December 31, 2017

💐💐💐💐🎀🎀💐💐💐💐नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात महाबली, सरलष्कर, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना वंदन करुन ..
या महाबलीचं वर्णन शिवभारतकार करतात..
" बिंदुपुर ( बेदनुर ) चा राजा महातेजस्वी वीरभद्र, वृषपत्तनचा प्रसिद्ध राजा केंगनाईक, कावेरीपत्तनचा राजा महाबाहु जगदेव, श्रीरंगपट्टनचा राजा क्रूर कंठीराव, तंजावरचा राजा विजयराघव, तंजीचा (चंची) राजा प्रौढ़ वेंकटनाईक, मदुरेचा राजा गर्विष्ठ त्रिमलनाईक, पिलगुंडचा राजा उद्धट वेंकटाप्पा, विद्यानगरचा (विजयानगर) राजा धीट श्रीरंगराजा, हंसकुटचा ( होस्पेट) राजा प्रसिद्ध तम्मगौड़ा आणि इतरही राजांना शहाजीने आपल्या पराक्रमाने ताब्यात आणले "
कर्नाटकात आपल्या पराक्रम मुत्सद्दी राजकारणाने महाबली शहाजीराजे यांनी बेंगलूर ही जिंकले होते ते शहाजीराजांना देण्यात आले. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी बेंगलूर येथे राहून आपले अधिकार क्षेत्र वाढवले, आदिलशाहीची राजधानी विजापुर असूनही शहाजीराजे हे बेंगलूर येथे दरबारी आपली फौज, अनेक कवी, पंडित आणि अधिकारी यांच्यासह वात्सव्यास राहून आपली कर्तबगारी बजावत वेगळे स्वतंत्र असे राज्य चालवत होते. महाबली शहाजी महाराजांच्या या सर्व कर्तबगारीत आणि भुतकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा सार आहे.
पराक्रम, धाडस, राजकीय मुत्सद्दगीरी आणि प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या या महापुरूषास मानाचा मुजरा ..!
  आपणा सर्वांस नव वर्षाच्या शिवमय शिवशुभेच्छा..!!
...जय शहाजी राजे..
     जय जिजाऊ..!
     जय शिवराय..!
शिवश्री संतोष तळेकर सर
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

No comments:

Post a Comment