भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Sunday, July 23, 2017

कविराज भूषण रायगडी असताना असाच पाऊस आला असावा या पावसाला बघून भूषण म्हणत आहेत  :-

चमकती चपला न फेरत फिरंगै भट इंद्र की न चाप रूप बैरख समाज कौ |
धाए धुरवा न छाए धूरी के पटल मेघ गजिबौ न साजिबौ है दंदुभी आवाज कौ |
भ्वैसिला के डरन डरानी रिपुरानी कहै पिय भजौ देखि उदौ पावस की साज कौ |
घन की घटा न गजघटनि सनाह साज भूषण भनत आयौ सैन सिवराज कौ ||
:- कविराज भूषण

अर्थ :-

ही चमकणारी चपला(विज) नव्हे. या विरांच्या सळसळणा-या तलवारी आहेत. हे इंद्राचे धन्युष्य नव्हे, हा तर सैन्याचा झेंडा आहे. हे ढग नाहीत. ही तर सैन्याच्या हालचालीमुळे उठलेली धूळ आहे. ही मेघ गर्जना नाही. हा रणवाद्यांचा घोष आहे. तो मेघसमुदाय नाही, तर कवचांनी सिध्द झालेले हत्ती आहेत. शिवरायांच्या या भिषण रणघोषाने भेदरलेल्या शत्रुस्त्रिया आपल्या सख्यांना म्हणत आहेत की, ही पावसाची चिन्हे नाहीत. हा तर शिवरायांच्या सैन्याचा हल्ला यावयाची चिन्हे आहेत.

No comments:

Post a Comment