भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Sunday, August 21, 2022

गरज आहे आपल्या आयुष्यातील "तो" कृष्ण ओळखण्याची..!

गरज आहे आपल्या आयुष्यातील "तो" कृष्ण ओळखण्याची..!
... तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्या ही...
प्रेम त्याने राधेवर ही केले आणि अर्जुना वरही केले...राधा आपली नव्हती आणि होणार ही नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धात अर्जुन जिंकून ही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती ..पण हे असूनही त्याने ही दोन्ही नाती अतिशय समरस होवून निभावली !! एकदा गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही आणि राज्याभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यात ही तो परत कधीच आला नाही....अत्यंत उत्कटपणे नाती निभावून ही त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला...परत कधीच परतून न येण्यासाठी !! त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना कधी खेद झाला ...राधे बरोबर प्रेमाचे हळूवार नाते त्याने जपले यात त्याला लोक अपवाद आला तरीही त्याचे बासरीचे सुर कधी बहरले नाहीत असे कधीच झाले नाही !! ज्या उत्कटतेने त्याने राधेसाठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळूवार अनुभव दिला तसाच अर्जुना बरोबर युद्ध करताना कुरुक्षेत्र आपल्या अफलातून डावपेच आणि कुट नीतीने गाजवले . राधे ला तो जीवन का आणि कसे जगायचे हे कोमल होवून सांगत असे त्याच आपुलकी ने अर्जुनला शत्रूस कसे आणि का संपवायचे हे ही ही सांगितले , एका पेक्षा एक अभेद्य , अमर आणि महावीर योद्धे त्याने लीलया वरती ढगात पाठवले जे त्याचे शत्रू नव्हते पण नाते जपताना त्याने तुझे माझे याचा त्याग केला होता....ज्या हळूवार पने त्याची बोटे बासरीवर फिरत असत त्याच हळूवार पने त्याची बोटे सुदर्शन चक्र ही चालवत असत....
हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही......कारण....कारण तो कृष्ण होता ....संभवामी युगे युगे असे त्याचे स्वतः चे वचन आहे...तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता...आहे आणि राहील....गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला ओळखण्याची...!!

 

No comments:

Post a Comment