एक तास मैत्रीचा ......
या सह शालेय उपक्रमात रममान
विद्यार्थी..
काल
परवा पायाभूत चाचणी पुर्ण झाली,या पायाभूत चाचणी अंतर्गत काही मुले काही विषयात कच्चे असल्याचे
जानवले,थोडावेळ विचार केला,मुलांशी चर्चा केली वर्गातील, शिवनेरी,प्रतापगड,रायगड,सिंहगड,
सिंधूदुर्ग,राजगड,पुरंदर,विजयदुर्ग या गटातील गट
प्रमुखांची मत घेतली,त्यांनी
प्रत्येकांनी आपापले मत मांडली,दहा मिनिट त्यांना वेळ दिला त्यातून त्यांनी सर्वानुमते असे ठरवले
की सर आम्ही ती जबाबदारी घेतो आमच्या गटातील जी मुले कच्ची आहेत त्यांना आम्ही
आमच्यातील एक तास मैञीचा अभ्यासासाठी देवू..! त्यानंतर दुपारच्या जेवनानंतर एक तास
द्यायचा असे ठरवले,
दुपारी सहज मी त्यांचे निरीक्षण केले तर सर्व
गट आपल्या मिञासोबत अभ्यासात मग्न असलेले दिसून आले..!!
हे पाहून मनाला खुप आनंद झाला,खरच चलो जिते है हम...!!
No comments:
Post a Comment