भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Saturday, June 17, 2017

१७ जून जिजाऊ स्मृतिदिन..!



आज १७ जून १६७४
" राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मॉसाहेब स्मृती दिन "
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांनी"आऊसाहेब जिजाऊ"यांच किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या"पाचाड"या गावी निधन झालं.
लाखो-करोडोंचा हा महाराष्ट्र दुखाच्या छायेखाली गेला.
स्वराज्याची प्रेरणाच स्वराज्यातून निघून गेली.
आमचा शिवबा पोरका झाला, आमचा बाळशंभू पोरका झाला,
आमचा रायगड पोरका झाला, आमचा सह्याद्री पोरका झाला,
आणि आमचं"स्वराज्य"पोरकं झालं.
आधार गेला आमचा, आता उरला फक्त घनदाट अंधार……
याच"जिजाऊ"ज्यांच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती,
याच"जिजाऊ"ज्यांनी घडविले"राजे शिवछत्रपती".
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नी शंभु छावा....!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा ....!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे ......!
जिजाऊ तुम्ही नसता तर दिसले नसते विजयाचे सोहळे ..... !
आऊसाहेब जिजाऊना त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन..!!
तुमचे आमचे नाते काय
जय जिजाऊ जय शिवराय ..!
शिवश्री संतोष तळेकर सर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment