भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

लोकमान्य टिळक


  नमस्कार...
    मी-----------------------
           अध्यक्ष महाशय, गुरुजन आणि उपस्थित सर्व माझ्या बाल मित्र-मैत्रीणीनो....
    आज १ ऑगस्ट, लोकमान्य टिळकांचा स्मृतीदिवस.!
     स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच..असा खडा आवाज संपूर्ण भारताच्या काना कोपऱ्यात एक ज्वालामुखी प्रमाणे भिनला त्या आवाजाने स्वराज्यासाठी या भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची होळी खेळण्यासाठी मेरा रंग दे बसंती चोला क्रांतीकारकांची एक विशाल फौज तयार झाली त्यांनी भारत स्वतंत्र होण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला त्या सिहांचा आज स्मृतीदिवस ...!
     लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते. टिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना बाळया टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना सुर्याचे पिल्लूम्हणायचे. अभ्यास संपला की, बाळ आजोबांकडे स्वातंत्र्ययुद्धाच्या गोष्टी ऐकण्याकरिता धाव घेई. मोठा झाल्यावर मीही मातृभूमीची अशीच सेवा करीन,असा विचार या बाळाच्या मनात लहानपणीच रुजला.
     टिळक हे स्वाभिमानी होते,खोटे त्यांना कधीही पटले नाही, एकदा शाळेत असताना, वर्गात मुलांनी शेंगांची टरफले टाकली. गुरुजी वर्गात आल्या नंतर त्यांनी हे पाहिले आणि टिळकांना विचारले, हि टरफले कोणी टाकली ते सांग, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. एकदा वर्गात गुरुजींनी संत हा शब्द लिहावयास सांगितला. टिळकांनी तो शब्द तीन प्रकारे लिहिला संत, सन्त, सनत. गुरुजींनी त्यातला पहिला शब्द बरोबर देऊन बाकीचे दोन चूक दिले. त्यावर टिळकांनी गुरुजींना सर्व शब्द कसे बरोबर आहेत ते सांगितले.
      टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले.पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, ही चतुसुत्रीचा विचार त्यांनी जनमानसात रुजवला, त्यांनी लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणपती उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. मधुमेहाच्या आजारात आजच्या म्हणजे १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले.
अशा या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना शतशः प्रणाम.
 जय हिंद ! जय महाराष्ट्र !

                                                                                           
                                                  श्री संतोष भगवान तळेकर
                                                      प्राथमिक शिक्षक                                         जि.प.शाळा खानिव,केंद्र.कासा,
                                                     ता.डहाणू,जि.पालघर


 PDF साठी   DOWNLOAD   येथे क्लिक करा 

4 comments:

  1. जसे फुलेंना महात्मा' ही पदवी लोकांनी 1888 साली दिली तशी टिळकांना 'लोकमान्य' ही पदवी कोणी दिली?

    ReplyDelete
    Replies
    1. फुलेंना 'महात्मा' पदवी त्यांनीच बनवलेल्या 'सत्यशोधक समाज'या संघटनेने म्हणजे स्वता:च स्वत:ला दिलेली आहे.लोकांनी सदर पदवी दिली हा एक प्रचाराचा भाग असू शकतो.

      Delete
    2. बेटा अभ्यास कर चांगला...अकलेचा वापर कमी करतं आहेस तु

      Delete
    3. टिळकांना कोणीही लोकमान्य पदवी दिली नाही त्याचे पुरावे नाहीत

      Delete